Spirituality In Your Business....
Spirituality म्हणजे अध्यात्म ... बहुदा लोक अध्यात्माला चुकीच्या अर्थी घेऊन त्याला धार्मिक करतात... अध्यात्म म्हणजे धार्मिक गोष्टी किंवा एखादी रितीभाती नव्हे... अध्यात्म म्हणजे स्वतःला.... स्वतःच्या नैसर्गिक शक्तींना ह्या निर्सगाशी जोडणे... विलीन करणे... ह्या निसर्गाचे काही नियम आहेत आणि ते जर तुम्ही खऱ्या मनाने स्वीकारून फॉलो केलेत तर तुम्ही निसर्गाच्या सर्व शक्तींचा लाभ घेऊ शकता... जे खूप सोपे आहे पण रस्ता कठिण... ह्याच गोष्टी जर सकारात्मकतेने घेतल्या तर तुम्ही कोणत्याही व्यवसायात यश मिळवू शकता... तुमच्या उद्योगात आणि यशाच्या मध्ये मोलाचे काम करते अध्यात्म...आज वर जे जे बिझिनेस मन मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले किंवा शून्यात विश्व निर्माण केले ते सर्व अध्यात्माच्या आणि नेचर लॉशी खूप निगडीत होते किंवा आहेत.... आणि आजही ते ह्या गोष्टी मनापासून फॉलो करतात...
आज त्यातील काही गोष्टी किंवा कोणते बदल अपेक्षित आहे उद्योगात अध्यात्माची जोड़ घेऊन ते आज आपण बघूया...
1. सकारात्मक दृष्टिकोन -
परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपला दृष्टिकोण आपण बदलू नये.. प्रत्येक वाईट गोष्टीत 50% चांगल्या गोष्टी दडलेल्या असतात... त्या शोधण्याचा.... स्वीकारण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करा...
2. बेस्ट फ्रॉम वेस्ट -
जेवढे पण वेस्ट तुमच्या कामात तयार होते त्यातून नेहमी बेस्ट करण्याचा आणि ऑफीस मध्ये करवून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण निसर्गाला मदत करू आणि त्याचा फायदा संपूर्ण जीव सृष्टीला होईल...
3. संवेदनशील व्हा पण भावनाप्रधान नको (Keep highest Emotion but Don't get Emotional)
जेव्हा तुम्ही संवेदनशील रहाता तुमची विचारसरणी विश्वव्यापक असते आणि तुमचा दृष्टिकोन हा रुंद व व्यापक असतो पण जेव्हा तुम्ही भावनाप्रधान होता तुम्ही संकुचित होत जाता... म्हणून भावनांना तुमचा strong point बनवा weak point नव्हे... आणि लक्ष्यात ठेवा ह्या जगात संवेदनशील व्यक्तीच उद्योग विश्व निर्माण करू शकते... म्हणून भावनांना दिशा द्या... आणि त्याला फोकस करा...
4. ग्लोबल प्रॉजेक्ट करा-
जर तुम्हांला खरच उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर ग्लोबल प्रॉब्लेमला धरून प्रॉजेक्ट करा तुम्हांला निसर्ग पटापट मदत करायला सुरू करेल...
5. 100% समोरच्या व्यक्तीला समजून स्वीकार करा -
99%लोक त्यांच्या डोळ्यावर असलेल्या चश्म्याने जगाला बघतात आणि त्यांच्या अनुभवांवरून लोकांना समजायचा प्रयत्न करतात जर तुम्हांला उद्योगात क्लेश त्रास नको असतील तर समोरच्याला 100% समजण्याची एक संधी द्या आणि जशी असेल समोरची व्यक्ती त्याचा स्वीकार करा तरच तुम्ही ह्या जगात सर्वासोबत पुढे जाऊ शकता आणि बेस्ट लिडर बनू शकता...
6. बॉस नको लीडर हवा-
उद्योगात बॉस बनून ऑर्डर सोडण्यापेक्षा मन जिंकून लिडर बना... जेणे करून तुमचे नोकर होण्यापेक्षा तुमचा स्टाफ तुमचा फॅन बनेल आणि तुम्हांला फॉलो करेल...
7. एको फ्रेंडली वस्तूंचा वापर -
शक्यतो एको फ्रेंडली वस्तू किंवा रिसायकल होणाऱ्या वस्तूंचा उपयोग करा जेणे करून ऑफीस मध्ये सहजता निर्माण होते आणि तुम्ही निसर्गाशी जोडले जाल..
8. उद्योग वृद्धिसाठी गुंतवणूक माणसांत करा-
उत्तम रिझर्ट हवे तर स्किल्सफूल स्टाफ घ्या, त्यांना बेस्ट रिझर्टसाठी उद्युक्त करा आणि त्यांच्याकडून बेस्ट रिझर्टसाठी योजना बनवा.. वस्तू खराब झाली की नुकसान होते पण व्यक्ती दूर झाल्या तर समस्या निर्माण होतात...
9. नैतिकता आणि नीतीमूल्ये-
उद्योगात जर स्वतःशी आणि उद्योगाशी प्रामाणिकता हवी तर नैतिकता आणि नीतीमूल्ये असणे आवश्यक आहे. कारण ह्या दोन गोष्टी तुमच्या उद्योगाला , प्रॉडक्टला किंवा सर्विसेसला भक्कमता आणि योग्य दिशा देतात.
10. चाकोरी बाहेरची विचारसरणी-
चाकोरी बाहेर विचारसरणी असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही तुमच्या क्षेत्रात वेगळे काहीसे करू शकाल.. त्यासाठी खूप जास्त फोकस आणि कॉन्सेंट्रेशनची आवश्यकता आहे. त्यासाठी स्ट्रेस फ्री होणे आवश्यक आहे.
उद्योगात अध्यात्म विकास करायचा असेल तर खालील गुण स्वीकारा -
1. स्पष्ट , सुंदर आणि मृदु वाणी
शब्द हे नेहमी आपल्या प्रतिमेचा आरसा असतात.
2. स्थिर आणि फोकस विचार-
फोकस विचार लेझर सारखे असतात त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम सॉल्व होतात.
3. मदतशीलता-
विकासाचा विचार आला की हात पुढे करून देणे आले.
4. संयम -
मनावर विचारांवर संयम हवा
5. शांत आणि सामंजस्य -
समतोल शांत आणि सामंजस्य विचारसरणी खोल असते आणि त्यामुळे उद्योगात भेदकता निर्माण होते.
#DrShivangi
#Born2Biz

Comments
Post a Comment