उद्योग प्रेरणा : व्यक्तीमत्वाची नविन ओळख
“पेटून उठावे, उजळून जळावे,
कधीतरी चमकण्यासाठी, सुर्यासारखे जळून बघावे”
उद्योगधंद्यात यश मिळवण्यासाठी आणि आपल्या प्रतिभेला उच्चांकावर पोहोचवण्यासाठी गरज असते प्रेरणेची म्हणजे just Fire up!... म्हणजे पेटून उठण्याची... जीवनात काहे तरी करावे... उद्योग सुरु करावा स्वत:चे Own boss व्हावे अश्या ब-याच कल्पना सर्वांच्या मनात येत असतात पण, ह्या कल्पनांना वास्तवात काहीच लोकं रुपांतरीत करु शकतात आणि ह्याच बदलाला महत्वाचे स्वरुप मिळते, तुमच्या मनाच्या तयारीने... आणि तुमच्यातील त्या प्रेरणेने... कल्पना, विचार किंवा मन ही गोष्ट, एका ३६०च्या स्पीडने पळणा-या भरधाव कार सारखी असते त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो ... पण ह्याला साथ लागते तुमच्या संयमरुपी ड्रायवरची म्हणजे तुमच्या सतत जीवंत असलेल्या प्रतिभेने उजळून निघालेल्या प्रेरणेची. उद्योगात प्रबल इच्छाशक्ती लागतेच, योग्य मार्गदर्शन सुध्दा हवेच किंवा संकटांला संधीत रुपांतरीत करण्याची तयारी लागते , अश्या प्रकारच्या उद्योगाला लागणा-या तांत्रिक बाबी आपल्याला वारंवार मासिक, पुस्तके किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून मिळत असतात तरीही आपल्या उद्योगाची पाटी कोरी ती कोरीचं,
असे का???????
असे का? ह्याचे उत्तर खालील प्रमाणे आहे:-
उद्योगात जर उच्चांक गाठायचा असेल तर जस्ट फ़ायर अप!!... शेवटी पेटून उठल्याशिवाय उजळता येत नाही. उद्योग ही कोळश्याची खाण आहे.जर आपण फ़क्त नकारत्मक आणि नैराश्यवादी गोष्टी मनात आणत असू तर ते फ़क्त कोळसा उगाळण्यासारखे आहे शेवटी कोळसा कितीही उगाळला तरीही काळाचं!... पण ह्याच कोळश्याला इंधन म्हणून जाळले तर मात्र हवे असलेले परिणाम मिळतात आणि आपल्या उद्योगाचे इंजिन भरधाव पळू लागते.... त्यात उद्योगात jackpot लागला तर ह्याच उद्योग करीअरच्या काळोखी आणि भयाण खाणीत अकस्मात हिरे पण सापडतात.
प्रेरणेची उद्योगात गरज का?
निर्सगाचा नियम सर्वांना सारखाचं!... कोणतेही इंधन पेटवायचे असेल तर एक ठिणगी सुध्दा पुरेशी असते आणि एकदा पेट घेटला तर सतत प्रज्वलित होण्यासाठी त्यात थोडे थोडे इंधन टाकत राहण्याची गरज असते अश्याच प्रकारे आपण उद्योग सुरु करतो पण काही अपयश आले, संकटे आली तर आपण उद्योगाचा साथ सोडून पळून जातो आणि बिचारा उद्योग खंगून खंगून दम सोडतो. संकटाच्या वेळी प्रेरणा ही एका प्राणदायक अमृतासारखी ठरते. ह्याप्रेरणेने तुम्ही यश मिळवता आणि तुमचा उद्योग टिकवता.
प्रेरणा तुमच्यासाठी कशी महत्वाची ठरते?
आपण जे काही जाणतो, शिकतो, समजतो ते सर्व मनात एका ठिकाणी साठवून ठेवतो.ह्यात चांगल्या सोबत वाईट गोष्टी पण चालून येतात. जर आपण आपल्या अनुभवांचा आढावा घेतला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ह्या अनुभवांचे पडसाद आपल्या कामावर आणि व्यक्तिगत जीवनावर उमटतात. ह्या सर्व मनावर चिटकलेल्या जळमटांना जर दूर करायचे असेल तर जस्ट फ़ायर अप!... ह्याने सर्व नको असलेल्या गोष्टी दूर होऊन तुम्ही मोकळेपणाने श्वास घेऊ शकतात.
नेहमीच प्रेरणा कशी घ्यावी वा मनाला द्यावी?
१. जुन्या आणि नको असलेल्या सवयीत बदल:
बदल म्हटला की सर्वांच्या तोंडाचे पाणी पळते. आपण काय हवे आणि काय नको मध्ये कधीचं समन्वय साधू शकत नाही. म्हणून मला काय हवे !...हा प्रश्न वारंवार येतो पण काय नको ह्या प्रश्नापासून दूर प्ळत सुटतो. म्हणून नको असलेल्या गोष्टी सतत चिटकून राहतात आणि आपली प्रगती होेऊ शकत नाही.
२. फ़ायर अप... डोन्ट बर्न युअरसेल्फ़ – पेटून उठा पण जळू नका:-
पेटणे आणि जळणे ह्यात भल्याभल्यांना फ़रक समजत नाही. कारण फ़ायर अप !... म्हणजे स्वत:ला त्रास देणे नाही तर उद्योगासाठी स्वकष्टाने पेटून आणि उजळून निघणे. एका दिव्या सारखे स्वत:ला प्रज्वलित करुन सर्वांना प्रकाश देऊन स्वत:ला सुध्दा प्रकाशित करावे. काही लोकं स्वत:ला फ़क्त कापरासारखे जाळून घेतात आणि राख बनतात पण तुम्ही एका लामण दिव्यासारखे स्वत:ला तेवत ठेवा.
३. सातत्य:
प्रगती हवी तर सातत्य हवे...सातत्य उद्योगात प्राणवायूचे काम करते. सातत्य नसेल, तर मोठे-मोठे मनोरे ढासळतात आणि बेचिराक होतात. खास, विशेषत: महिला उद्योजिका उद्योग, बचत गट फ़टाफ़ट सुरु करतात पण नंतर ह्याच लोकांचा उत्साह कुटुंब, घर, ह्यांच्या ओझ्याखाली सातत्य नावाचा शब्द डिशनरीतून निघून जातो.
उद्योगात खालील गोष्टीत सातत्य हवे:
नविन गोष्ट शिकणे
नविन गोष्ट शिकवणे
उद्योगांना मित्र बनवणे
उद्योगांआ कौटुंबिक स्थान मिळवून देणे
४. उभे रहा स्वत:ला उभे करण्यासाठी :
नाविण्यपूर्ण विचार, उद्योगांना उभारी देते आणि उच्चांक गाठण्याची संधी मिळवून देते. म्हणून नविन नविन कल्पनांचा विचार करा, त्यातून नविन उद्योग पर्व सुरु होईल.
“ एक छोटी कल्पना... १०० उद्योगांना प्रेरणा देते”
५. संकटांवर मात, संधी शोधण्याची साथ:
संकटाला संधीत रुपांतर केले तर संकटाची भीती नष्ट होते आणि त्यात लाखो नविन कल्पना उदयाला येतात. कारण जेव्हा संकट येते तेव्हा ते दूर करण्याच्या आयडिया आपण विचार करु लागतो आणो त्यतून कल्पना सुचू लागतात आणि संधी चालून येतात.
६. माईंड सोक आणि माईंड स्क्विझ मेथड:
माणसाचे मन हे स्पंज सारखे असते, सर्व चांगल्या व वाईट गोष्टी शोधत असते. जर स्पंज घाणीत ठेवला तर तो घाण शोषून घेतो तसेच आपले मन दररोज विविध विचार, अनुभव, कृती मधून घाण आपल्या मनावर साचवत असतो. अश्या ह्या मनाच्या स्पंजला दररोज नाही तरी आठवड्याने साफ़ करायची गरज असते. त्यासाठी स्वत:ला चार्ज ठेवणा-या गोष्टी करत रहा आणि आठवड्यातून एकदा तरी स्वत:सोबत वेळ काढा. आपले छंद जोपासा.
७. शक्तीचा योग्य उपयोग:
जेव्हा आपली शाररीक आणि मानसिक शक्ती जिथे एकवटते तिथे ती लेझर बीमचे काम करते म्हणून ही शक्ती एकवटण्याचे काम करते माईंड योग, ध्यानसाधना आणि एन.एल.पी. हे जर तुम्ही शिकून घ्याल तर शक्ती आणि युक्तीने तुम्ही नेहमीच प्रेरीत होत रहाल.
“ उद्योगाच्या दोरीला दोन बाजूने समांतरीत करावे,
एका बाजूने वाढवावे, तर दुस-या बाजूने संभाळावे...”
उद्योगात प्रेरणा ही गतीमान बाब आहे, आणि प्रतिभा ही स्थिर असते. जेव्हा एका स्थिर प्रतिभेने तुम्ही हा उद्योगरथ चालवतात तेव्हा नीती, कौशल्य, मूल्य आणि तत्व उद्योगात उतरतात आणि तुम्ही प्रगती करु शकतात.
“आज प्रतिभेच्या काजव्याने जीवनाचे झाड उजळले,
विचारांच्या गतीने व्यक्तिमत्वाच्या प्रतिमेला सुधरवले.
प्रेरणाघेऊन सुर्याची,एका इच्छेच्या ठिणगीने, संपूर्ण उद्योगविश्वात आशेच्या वणव्याला पेटवले “
डॉ. शिवांगी झरकर
संचालिका – बॉ
र्न २ बिझ
बिझीनेस आणि फ़्रांचाईझी कंस्टटंट
मोबाईल क्रमांक – 8850560056
Email – shivangizarkar@gmail.com

Comments
Post a Comment