उद्योग संस्कार : उद्योगाला एक नाविण्यपूर्ण आकार
उद्योग संस्कार म्हणजे काय?
मुल जन्माला आल्यापासून, ज्या छोट्या छोट्या सवयी मधून त्याला जे जे शिकायला मिळते, त्यामुळे मुलाच्या जीवनाला व मनाला एक दिशा मिळते आणि त्यांची फ़लश्रुती म्हणून मिळते त्याला एक व्यक्तीमत्व. जे त्याला घडवते, बनवते आणि पुढे नेते. त्याच्या बळावर ते मुल मोठे होऊन प्रगती करते, परंतु कितीही बदल आपल्या जीवनात आपण केले, तरीही बालपणीच्या त्या सवयी कधीही कोणीच मिटवू शकत नाही ना पुसले जाते. असेच काहीस नाते असते उद्योगाचे , आपले आणि उद्योग संस्काराचे..... आपल्याला जे जे अनुभव उद्योग क्षेत्रात येतात... जे आपण प्रत्येक क्षणात शिकतो... त्याच्याने आपले व्यावसायिक, सामाजिक आणि आर्थिक चित्र सुस्पष्ट होते, त्यांना उराशी बाळगत निर्माण होते, एक उद्योग प्रतिबिंब. हे प्रतिबिंब जर तुम्हांला स्वच्छ , निर्मळ आणि तेजस्वी ठेवायचे असेल , तर दररोज द्यावे लागतात.
“ उद्योग संस्कार ”
मित्रांनो , उद्योगाला धंदा आणि व्यवसाय असेही म्हणतात. परंतु धंदा आणि व्यवसाय ह्या दोन्ही गोष्टी थोड्याफ़ार प्रमाणात उद्योगाहून भिन्न आहेत. धंदा म्हणजे धनदा (धन देणारा किंवा धन आणणारा) त्याच प्रमाणे व्यवसाय म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला दिशा देणारा.... ह्यासर्व गोष्टीहून थोड्याप्रमाणात भिन्न म्हणजे उद्योग... ह्यामध्ये योग आहे... एक साधना आहे... एकसूत्रता आहे... भावना आहे... स्वत:ला स्वत:शी ओळख करवून देणारा तो म्हणजे उद्योग... आणि ह्याच उद्योगाची दोन मुले , ती म्हणजे धंदा आणि व्यवसाय. अश्या ह्या उद्योग परिवाराला एकजूट करायचे असेल, तर उद्योजकाला लागतात उद्योग संस्कार !...
उद्योग संस्कार कोणकोणते असतात?
उद्योग आकलन :
उद्योग आकलन म्हणजे उद्योगाची तुम्हांला आणि तुमची उद्योगाला ओळख... त्याच सोबत एकमेकांबरोबरची सवय... उद्योग निवड करण्याआधी तुम्हांला उद्योग ह्या शब्दाचा अर्थ माहित असणे आवश्यक आहे. उद्योग निवडला म्हणजे उद्योग समजला किंवा उद्योगाची संपूर्ण माहिती झाली असे होत नाही. त्यासाठी आपण उद्योगाबद्दलचे आकलन करणे आवश्यक आहे. उद्योगाच्या आकलनामध्ये उद्योगांचे नियम, उद्योग सूत्रे, उद्योगचे बारकावे, नीती आणि उद्योगाची खोली माहिती असणे आवश्यक आहे. उद्योगाचे तुमच्या सोबत अतुट नाते निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणजे वेगवेगळ्या उद्योगांच्या प्रगतीचे, शेअरचे, प्रकारांचे, बारकाव्यांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आज पासून उद्योग शिक्षण घेणे घेणे आवश्यक आहे.
उद्योग निवड :
जशी आवड तशीच निवड असते... आणि प्रत्येक व्यक्ती भिन्न, मग आवडही भिन्नच असणार आणि त्यांची उद्योगाच्या बाबत निवडही भिन्नच असणारचं ! म्हणून जर उद्योग निवडायचा असेल तर खालील बाबींवर नजर टाकणे आवश्यक आहे.
तुमच्या आवडी
तुमच्या सवयी
तुमचा स्वभाव
तुमचे सामर्थ्य आणि त्रूटी
तुमचे गुण आणि दोष
तुमचा वेग ( लक्ष्यापर्यंत पोहचण्याचे अंतर / वेळ)
तुमचे &aन, कौशल्य आणि दृष्टिकोन ह्यांचा समतोल
तुमची विचारसरणी
तुमची सर्जनशीलता आणि चाकोरी बाहेर विचारसरणी
तुमचे ध्येय, धारणा आणि लक्ष्यभेदन
तुमचे नियोजन आणि योजना
तुम्हांला मिळणा-या संधी आणि वाटेत असलेली संकटे
ह्या सर्व गोष्टी तपासून मग उद्योग निवडा.
उद्योगासाठी आवश्यक मानसिकता :
उद्योग सुरु केल्यापासून तो टिकवण्यापर्यंतच्या प्रवासात उद्योग संस्कार अमृता सारखे काम करते, त्यामुळे कितीही संकटे आली तरीही उद्योग ह्या स्पर्धात्मक जगात सुद्धा टिकून राहतो आणि त्याला दिवसोंदिवस बळकटी येते आणि हे उद्योग संस्कार आत्मसात करण्यासाठी आपण स्वत: उद्योगासाठी लागणारी मानसिकता समजली पाहिजे....त्या मानसिकता कोणत्या हे आपण समजून घेऊ.
धडाडी दाखवा - जर उद्योगात यशस्वी व्हायंच असेल, तर धडाडी दाखवणे गरजेचे आहे. कारण उद्योगात कोणत्याही कमकुवतपणाला स्थान नसते. त्यामुळे जेवढी मोठी जोखीम तेवढे यश मिळते.
दृष्टीकोन म्हणजे सर्वस्व – उद्योगात, दृष्टीकोन म्हणजे सर्वस्व आहे. त्यामुळे नकारत्मक दृष्टीकोन सोडा आणि सकारत्मक विचार करा. स्वत:वर विश्वास करायला शिका. स्वत:ला जिंकले तर उद्योगाच्या माध्यमातून जगाला जिंकाल.
योग्य निवड करा – निवड हा एक शब्द तुम्हांला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाऊ शकतो किंवा रसातळाला नेऊ शकतो. म्हणून निवड ही योग्य हवी. निवड...उद्योगाची, उद्योगाबाबतच्या परिस्थितीची, औद्योगीक मित्र-मैत्रीणींची, योग्य निर्णय घेण्याची असली तर तुमचे करिअर , उद्योग आणि जीवन सुरळीत सुरु राहते.
स्वत:च्या ध्येयांचा न बोलता स्विकार करा –
जसे निवड ही बाबी महत्वाची असते... त्याच प्रमाणे स्वत:च्या उद्दिष्टांचा, ध्येयांचा शोध घेऊन त्यांचा स्वीकार करणे महत्वाचे आहे. म्हणून आज पासून स्वत:चा स्विकार करायला सुरु करा. तुम्हांला नक्कीच यश मिळेल.
उद्देशपूर्व दृष्टी –
जर तुमच्या दृष्टीला योग्य असे उद्देश असतील तर तुम्ही त्वरीत यशस्वी होऊ शकतात. उद्देश नेहमी स्वार्थावर नसावा.. तो नेहमी स्वत:ला अर्थ देणारा असावा.
आव्हाने स्विकारा –
आव्हाने तुम्हांला तुमच्या यशाच्या आणि यशस्वी पाय-या मोजायला मदत करतात. म्हणून आव्हाने स्विकारा, त्यामुळे एक-एक पडाव पार करताना तुमचे उद्योग संस्कार एकदम पक्के होतात आणि तुम्ही वेगाने पुढे जातात.
जाणीव करुन घ्या आणि द्या –
जाणीव ह्या शब्दांतून तुम्हांला प्रत्येक पायरी जपायला, वाढवायला मदत होते. त्यामुळे तुमचा औद्योगिक इक्यू वाढायला मदत होते. त्यामुळे भावनात्मक होण्यापेक्षा तुम्ही सर्व निर्णय संवेदना आणि करुणाच्या जीवावर घ्यायला सुरु होता यासाठी जाणीव करुन घ्या आणि द्या.
आवड जपा-
जे जे तुम्हांला आवडते ते ते सर्व जपण्याचा आराखडा बनवा. त्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व आवडींना एक योग्य दिशा मिळेल.
कृत&ता बाळगा-
जेवढे जास्त तुम्ही कृत&ता दाखवाल, तेवढे जास्त तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल.
कृती करा-
उद्योगाबद्दल एवढे ऐकल्यानंतर त्याला कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे. म्हणून परिणामाची चिंता न करता, कृती करा आणि अनुभव मिळवा.
वरील १० मानसिकता उद्योगात अवलंबल्या तर तुमचा उद्याग एका ठरावीक उच्चांकाला येऊन पोहोचेल.
म्हणून उद्योग संस्कार महत्वाचे आहेत, त्यामुळे उद्योगात वेगाने प्रगती होते आणि आपण एक विशिष्ट शिखरावर पोहोचतो. म्हणून उद्योगाला जिवंत करा... जिवंत ठेवा आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठा. उद्योगाची गाडी ह्या उद्योग संस्काराच्या जीवावर खुप फ़ास्ट धावली पाहिजे. म्हणूनच उद्योग संस्काराचा बूस्टर डोस उद्योगाला देऊन उद्योग सशक्त करा...
डॉ.शिवांगी झरकर (बॉर्न २ बिझ – करिअर व बिझनेस ट्रेनर आणि गाईड ) मो. नंबर – 8850560056

Comments
Post a Comment