Skip to main content

NLP Sales and Marketing

एन. एल. पी. - मार्केटिंग व सेल्स (NLP – Marketing & Sales)

“मार्केटिंगला लागते सेल्सची जोड,
 आणि उद्योग जगात उद्योगवृध्दीसाठी एन. एल. पी शिवाय दुस-या कश्याची नाही तोड... ”
           उद्योग जर एक वाहन आहे तर उद्योग चालवण्यासाठी किंवा चालत ठेवण्यासाठी मार्केटिंग व सेल्स हे त्या वाहनात लागणारे इंधन आहे. माझ्या बऱ्याचश्या मित्र-मैत्रीणीना उद्योग हवा असतो वा सुरु करायचा असतो पण सर्वात मोठी गोष्ट आडवी येते ती म्हणजे मार्केटिंग व सेल्स. मार्केटिंग व सेल्स, हे दोन्ही नसेल, तर उद्योगाचे बारा वाजतात.
          मोठ-मोठ्या कंपनी मध्ये मार्केटिंग व सेल्सचे नियोजन करण्यासाठी,तसेच उद्योगातील मार्केटिंग म्हणजेच विपणन वृद्धी साठी धोरणे आखली जातात. परंतु एका सामान्य उद्योजकाला हे मार्केटिंग व सेल्स चे काम तसेच त्या अनुषंगाने येणारी अव्हाहने आणि त्या बद्दलची आखणी व धोरणे स्वतःच करावी लागतात आणि प्रश्न सुद्धा स्वतःच  सोडवावे लागतात.

आपल्याला उद्योग मार्केटिंगमध्ये येणारी आव्हाहने:
१. आपल्या उद्योगाबद्दल तसेच आपल्या प्रोडक्त किंवा सर्विसेस ची अपूर्ण माहिती.
२. उद्योगाला सर्वांसमोर मांडण्याची भीती किवा न्यूनगंड
३. आपल्याला समोरच्या ग्राहकाची अपूर्ण माहिती किंवा ग्राहकाच्या आवश्यकतेची अपूर्ण माहिती
४. ग्राहकाला अपूर्ण सादरीकरण
५. मार्केटची आवश्यकता आणि आपल्या पुरवठ्याचा बिघडलेला अंदाज
६. नाविण्यातेची कमी
७.  प्रोडक्त किंवा सर्विसेसची आवश्यकता निर्माण करण्याची कमी
८. योग्य पद्धतीच्या  मार्केटिंगची कमी

एन एल पी - मार्केटिंग व सेल्स म्हणजे काय?
एन एल पी म्हणजे आपल्या मनाच्या किंवा मेंदूच्या माध्यामातून आपल्या वर्तनात , स्वभावात आणि सवयीत बदल करणे. आता एन एल पी - मार्केटिंग व सेल्स म्हणजे नक्की काय? तर एन एल पी - मार्केटिंग व सेल्स म्हणजे आपल्या मनाचे न मेंदूचे मार्केटिंग व सेल्स साठी केले जाणारे प्रोग्रामिंग . ज्याच्या मदतीने आपण स्वतःमध्ये, आपल्या उद्योगात आणि  मार्केटिंग व सेल्स बदल करू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या ग्राहकाला आवश्यकतेप्रमाणे प्रोडक्त किंवा सर्विसेसचा पुरवठा करू शकतो.

एन एल पी - मार्केटिंग व सेल्स च्या माध्यमातून उद्योग कसा वाढतो?
एन एल पी - मार्केटिंग व सेल्स च्या माध्यमातून आपण आपल्या ग्राहकाची मानसिकता ओळखू शकतो त्याचप्रमाणे त्यांची आवश्यकता शोधू शकतो. आणि जर आपल्याला आवश्यकता समझली तर त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे प्रोडक्त किंवा सर्विसेसचा पुरवठा करू शकतो. एन एल पी - मार्केटिंग व सेल्सचा दुसरा फायदा म्हणजे आपण स्वतःची , उद्योगाची तसेच आपल्या कर्मचाऱ्यांची व ग्राहकांची योग्य रित्या काळजी घेऊ शकतो आणि योग्य सकारात्मक बदल घडवू शकतो.

एन एल पी - मार्केटिंग व सेल्सच्या टिप्स:
१. आपल्या ग्राहकाच्या आवडी-निवडीचा अंदाज घेणे व त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.
२. आपल्या स्वतःच्या आणि कर्मचार्यांच्या नातेसंबंधांना सुधारावण्याचा प्रयत्न करणे.
३. स्वतःच्या आणि समोरच्याच्या भावनांचा आणि दृष्टिकोनाचा विचार करणे.
४. आपल्या उद्योगात थीम आणि एक लय निर्माण करून त्याची मार्केटिंग करणे.
५. स्वतःच्या व्यक्तीमत्वाला ओळखणे आणि त्याच प्रकारच्या उद्योगाची आणि मार्केटिंग करण्याची सुरुवात करणे.
६. आपल्या प्रोडक्त किंवा सर्विसेस मध्ये नुतनता आणणे.
७. संमोहन करणाऱ्या शब्दांचा प्रयोग करणे.
८. आपल्या ६ सेन्सेस ला जागृत करणे आणि त्यांची जागृतता वाढवणे
९. मार्केटिंगसाठी स्वतःचा एक पट्टा आखून घेणे आणि त्यावर  मार्केटिंग करायला सुरु करणे.
१०.चाकोरी बाहेर जाउन विचार करणे आणि नवीन उद्योग व त्यावर अवलंबून असलेलेले जोड उद्योग निर्माण करणे.

कसा करावा  Rapport ?
अगदी सोप्पे आहे !..... समोरच्याच्या हाव भावाला मिळते जुळते हावभाव आणणे. त्यात आपल्या चेहऱ्याचे हावभाव विशेष करून येतात १. चेहऱ्यावर स्मित हास्य आणणे.
२. आत्म्विश्वस्नाने हस्तालोन्दन
३. नजरेला नजर देऊन व समोरच्याच्या तों भिवायान मध्ये बधून  बोलणे
४. समोरच्याचे विचार आणि हावभाव जाणून घेणे आणि त्या प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर हावभाव आणणे
५. समोरच्याच्या श्वासोछ्वासाशी  आपले श्वसन जुळवणे.
६. आवाजाशी , चेहऱ्याच्या हावाभावाशी , भाषाशैलीशी  जुळवणे.
७. मधून मधून विविध प्रलोभन देऊ करणे आणि समोरच्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणे.
८. स्वतःचे भावनांवर नियंत्रण ठेऊन डिल करणे.
९. सतत शिकणे आणि स्वतः मध्ये, उद्योगात, मार्केटिंग मध्ये बदल करणे.
१०. स्वतःला  आणि घरच्यांना वेळ देणे.

ह्या गोष्टी टाळाव्या:
१. अनेक तंत्रांचा उपयोग
२. अनेक मार्केटिंग व सेल्स च्या तंत्रांचा वापर
३. स्वतःचे मानसिक स्वास्थ खराब करून घेणे
४. हजार  प्रोडक्त किंवा सर्विसेस ची माहिती ग्राहकाला एकाच वेळेला देणे
५. बळजबरी करून ओर्डेर घेण्याचा प्रयत्न करणे.

२१ दिवसांचा प्लान :-
- १-७ दिवस स्वतःही आरश्याच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करणे , जेणे करून आपली बोलण्याची भीड चेपेल. त्याच प्रमाणे आपले संभाशन सुधारते.
-.८-१५ दिवस - घरच्यांशी आणि मित्र परिवाराशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करणे.
-१६ -2१ दिवस - जुन्या ग्राहकांशी पुन्हा जुदन्याचा प्रयत्न त्याच  प्रमाणे त्यांच्या आढावा घेणे
-२२ - पुढे दररोज सकारात्मक विचारांचा खुराक द्या
-२१ दिवस जर आपण सातत्याने पाठ पुरावा करू तर नक्कीच यश आपल्याला सर्वोच्च शिखरावर पोहोचवेल.

“ शिखरावर पोहोचायचे असेल तर लागते यशाची साथ...
आणि उद्योगात पुढे जायचे असेल, तर लागतो एन.एल.पी चा खंबीर हात...”
_________________________________________
डॉ. शिवांगी झरकर
संचालिका – बॉर्न २ बिझ
बिझीनेस आणि फ़्रांचाईझी कंस्टटंट
मोबाईल क्रमांक – 8850560056
Email – shivangizarkar@gmail.com


Comments

Popular posts from this blog

प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करावा ????

बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा... “ उद्योगाचे स्वप्न नुसते उराशी नका बाळगू .... आता त्याला बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट मध्ये रुपांतरीत करुन वास्तवात घडवू...” I.बिझिनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय? आपल्या मनात जेव्हा उद्योग करण्याची कल्पना येते... तेव्हा तेव्हा आपण त्या कल्पनेला वास्तवाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असतो... ह्याच वास्तवीक स्वरुपाला घडवण्याच्या मार्गात पहिले पाऊल म्हणजे आपल्या उद्योगाचा बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट. बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपल्या भावी उद्योगाचा, त्याच्या पद्धतीचा, संभाव्या नफ्याचा आणि येणाऱ्या 5 वर्षातील उत्पन्नाचा रीतसर आढावा असतो. ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कल्पनेला वास्तवात उतरवण्यात मदत करू शकता. II. बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्टचे फायदे:- 1. बिझिनेस मॉडेल डिझाईन करण्यात फायदा होतो. 2. उद्योगाचे नियोजन करण्यास मदत मिळते. 3. बँकेतर्फे कर्ज मिळवण्यास मदत मिळते. 4. बिझिनेस स्टार्ट-अपसाठी प्रार्थमिक गुंतवणूकदार मिळवण्यास मदत होते. 5. प्रत्येक पाऊल तोलून मापून घेण्यास मदत होते. III. बिझिनेस प्रॉजेक्टचा आराखडा :- 1. आपल्या कंपनीच...

Franchise Module

Franchise:                     Franchise means development. If you would like to run your business with passive income sources that time, business should be expand in multiple ways. Business goes hand and hand with marketing and franchising. There are lots of businesses which can be growing with franchise model. Franchise is replica of main branch or company.   Franchise Structure: 1.     Franchisee:  A person, who will buy a franchise, is a franchisee. After franchising, Franchise buys the right to operate a business, while using the franchisor name and existing branding.   2.     Franchisor:  This pertains to the company that sells franchises to franchisees. Franchisors are primarily the parent company that has settled and established processes, products, and branding. The same is then passed on to franchisees in exchange...

Time to Be Smart ....

Care About Your Results..... ससा कितीही फास्ट असो वा कासव कितीही स्लो.... जिँकतो तोच ज्याला दुसऱ्याला हरवण्यात वेळ नसतो... कारण तो स्वतःला जिंकवण्यात बिझी असतो.... प्रयत्न करणे जिंकण्याची सुरुवात असू शकते...पण शेवट नाही... तुमचे रिज़ल्ट्स तुमच्या यशाची व्याख्या सांगतात.. जे लोक बोलतात , आम्ही खूप प्रयत्न केलेत तरीही यश आले नाही ... ते तिथेच हरलेले असतात कारण त्यांनी अपयशानंतर प्रयत्न थांबवलेले असतात, पण विजेता तोच ठरतो जो शेवट पर्यंत टिकतो ... लढतो ... आणि विजयी होतो... म्हणून जिंकायचे असेल तर स्वतःला आधी विजेता मानायला शिका तरच संपूर्ण जग तुमचा विजेता म्हणून स्वीकार करेल... जर फक्त उंदरांच्या शर्यतीत पळाल तर फक्त उंदीर बनून अस्तित्वाशिवाय जगाल पण मासा बनून समुद्राला सुद्धा आव्हाहन द्याला तर नवीन नवीन मोती शोधून आणाल.... ह्या जगात प्रयत्नांत फक्त सहानभूती मिळू शकते पण यश ही एकमेव चावी आहे जी तुमचे सर्व रस्ते मोकळे करू शकते... तुम्हांला सन्मान प्राप्त करवून देऊ शकते... त्यामुळे असा विचार करा तुमची प्रत्येक मूव ही त्या क्षणांची लास्ट मूव आहे आणि जिंकायचे असेल तर ती बेस्ट कशी ...