उद्योगाचे बिझिनेस मॉडेल
I. उद्योगाचे नियोजन पूर्वतयारी -
उद्योग संस्कार झाले की वेळ येते उद्योग साक्षरतेची म्हणजे उद्योग शिकण्याची... उद्योग हा कृतीमधून शिकण्याचा विषय आहे, ज्यात प्रत्येक विषय वेगळा आणि त्याची तयारी, नियोजन, योजना, नफा-तोटा, ध्येय आणि त्याची धारणा संपूर्ण वेगळी असते. त्यामुळे उद्योग नियोजनापूर्वी तयारी करणे आवश्यक आहे. उद्योगाची पूर्वतयारी, तुमचे उद्योग बिझिनेस मॉडेल बनवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागजपत्रांच्या कामी येते त्यामुळे जर तुम्हांला उद्योग बिझिनेसचा मॉडेल किंबहुना आराखडा काढण्याचा वर्गपाठ पक्का करायचा असेल तर हा पूर्वतयारीचा गृहपाठ पक्का करणे आवश्यक आहे.
त्यासाठी खालील गोष्टींची वास्तव माहिती असणे आवश्यक आहे.
1. सुरू करणारा किंवा केलेला उद्योग हा निव्वळ हौस आहे की त्यात तुमचे काही ध्येय आणि लक्ष्य निश्चित केले आहे?
2. तुमची मालमत्ता आणि जवाबदाऱ्या किती आहेत?
3. तुम्हांला स्वतःचे प्रतीदिन किती उत्पन्न हवे आहे?
4. तुम्हांला त्या उद्योगाची तांत्रिक, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापनाची किती माहिती आहे?
5. तुम्ही निवडलेला उद्योग चीरकाळ टिकणारा आहे का?
वरील जर माहिती तुम्ही योग्य आणि अचूक मिळवली तर उद्योग बिझिनेस मॉडेलचे नियोजन अचूक होईल
II.उद्योगाचे बिझिनेस मॉडेल आणि त्याचे नियोजन :-
उद्योगाचे बिझिनेस मॉडेल एका रोड मॅपप्रमाणे असते. त्या बनवण्याच्या पायऱ्या आज आपण बघणार आहोत.
i. मुख्य भागीदार-
-तुमचे मुख्य भागीदार किती व कोणते?
तुम्हांला माहित हवे, जर भागीदारी केली तर प्रॉफिट वाटला जातो. म्हणून उद्योगाच्या सुरूवातीला घरच्या कौटुंबिक सदस्यांना भागीदारी द्वावी.
- भागीदारी मागे प्रेरणा काय?
भागीदारी मागे सर्वात महत्वाची प्रेरणा ही हवी की तुमचा उद्योग एकत्रपणे पुढे जायला पाहिजे. त्यात संपूर्ण सपोर्ट एकमेकांना मिळतो.
ii. मुख्य उपक्रम
-कोणती मुख्य वैशिष्ये तुम्ही ग्राहकांना देणार आहात?
ह्यात तुमच्या उद्योगाची प्रतिमा ठळक दिसून येते. त्यामुळे ग्राहकांना सुद्धा काहीही व्यवहार करणे सोप्पे होते.
- काय केल्याने ग्राहकांना तुमच्यावर विश्वास बसेल?
ग्राहकांचा विश्वास जिंकणे महत्वाचे असते, त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते हे जाणून प्रयत्न करायला हवेत.
iii. ग्राहकांचे विभाग
- तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांना प्रॉडक्ट किंवा सर्विसेस देऊ इच्छिता ?
ह्यात तुम्ही तुमच्या ग्राहकाचे प्रभाग आणि त्यांना उपयुक्त किंवा गरजेच्या वस्तू किंवा सेवा वय, लिंग, शहर, आजूबाजूचा परिसर, मानसिकता, व्यक्तिमत्व नमूद करू शकतात; ह्याच गोष्टींवरून तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्वीसेस ठरवू शकता किंवा बनवू शकता.
- तुमचे सर्वात महत्वाचे ग्राहक कोण?
तुम्ही हे आजच ठरवले पाहिजे कोणते ग्राहक जास्त गरजू आहेत तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेर्विसेससाठी.
iv. ग्राहकांशी औद्योगिक नातेसंबंध
- तुमच्या ग्राहकांना तुमच्यासोबत कसले औद्योगिक संबंध अपेक्षित असतात?
तुम्हांला तुमच्या ग्राहकाला, तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेर्विसेसबद्दल सेल्सनंतर कोणकोणत्या सेवा द्यावा लागतील ह्याचा विचार आधी करायला हवा.
- तुम्ही तुमच्या उद्योगाचा आराखडा तुमच्या अटींवर का निर्माण करावा ?
कधी कधी जर आराखडा तुमच्या नियमांवर व अटींवर नसेल तर तुम्हांला खुप समस्या येऊ शकतात.म्हणून आधीपासून तुमच्या उद्योगाचे नियम आणि अटी निश्चित असणे आवश्यक आहे.
V. महत्वाची साधनसंपत्ती
- तुमच्या उद्योगाला लागणारी महत्वाची आणि प्राथमिक साधने कोणती?
ह्यात तुमच्या उद्योगाच्या मूलभूत गरजांवर तुमच्या उद्योगाची प्राथमिक साधने ठरतात. उदा. मशनरी, कच्चामाल , जागा इ.
- कोणती साधनसंपत्ती तुम्हांला तुमचे डिस्ट्रिब्यूशन चानेल व ग्राहकांशी औद्योगिक संबंध अजून दृढ़ करतील?
तुम्ही आधीपासून तुमच्या उद्योगाला काय लागते ते आधी पासूनच निश्चित करा , त्यामुळे तुम्ही आधीपासूनच तुमची वेगवेगळी प्रसारमाध्यम आणि चानेल निश्चित करा... जेणे करून तुमचे औद्योगिक संबंध जास्तीत जास्त सुलभ आणि दृढ़ करा.
vi डिस्ट्रिब्यूशन चानेल
- कोणत्या चानेलने तुमचे ग्राहक तुमच्या पर्यंत पोहोचू शकतील?
तुम्ही असे चानेल निर्माण करा की तुमचा ग्राहक सोप्प्या पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहोचेल आणि तुमच्या सर्विसेस / प्रॉडक्ट तुमच्या ग्राहकांना सोयीस्कर रित्या मिळतील.
- डिस्ट्रिब्यूशन चानेलसाठी कोणती माहिती असणे आवश्यक असते ?
तुमच्या उद्योगासाठी कोणते चानेल उत्कृष्ट आहे?
त्यासाठी डिस्ट्रिब्यूशन चानेलची किंमत किती पडेल?
तुमची डिस्ट्रिब्यूशन चानेल तुमच्या आणि तुमच्या ग्राहकांमध्ये माध्यम म्हणून काम कसे करेल?
ह्या सर्व प्रश्नांवरुन तुम्हांला डिस्ट्रिब्यूशन चानेल निवडने आणि निर्माण करणे सोप्पे होते.
vii. किंमत आणि खर्चाची रचना आणि आराखडे:
- तुमच्या उद्योगात सर्वात मोठा खर्च आणि किंमत किती ?
उद्योगात सर्वात जास्त मोठे खर्च कोणते आहेत, त्याचा आराखडा आणि नियोजन असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवांची किंमत ठरवणे आवश्यक आहे.
- कोणत्या साधन संपत्ती सर्वात जास्त खर्चिक आहेत?
जेव्हा किंमत ठरवायची असते, तेव्हा सर्वात जास्त खर्च कोणत्या साधनसंपत्ती, प्रसार माध्यम आणि डिस्ट्रिब्यूशन चानेलवर होतो ते ठरणे आवश्यक आहे. ह्या सर्वांच्या खर्चावर तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्वीसेसची किंमत ठरते.
viii रेवेन्यू (महसूल) मॉडेल :
- रेवेन्यू मॉडेल कसे ठरले जाते ?
रेवेन्यू मॉडेल मध्ये सर्वात महत्वाची बाब ही असते की ग्राहकाला तुमच्या प्रॉडक्ट / सर्विस साठी किती किंमत मोजावी लागते. सध्या ग्राहक किती आणि कसे तुम्हांला ही किंमत मोजतात आणि त्यांना कश्याप्रकारे ही किंमत फेडायची आहे. आपल्या उद्योगात रेवेन्यू किंवा पैसे येण्याच्या किती शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेचा किती वाटा आहे. ह्यासर्व बाबींवर आपले रेवेन्यू मॉडेल ठरले जाते
अश्याच सर्व गोष्टींवर आपले पहिले बिझिनेस मॉडेल उभे राहू शकते. ह्या मॉडेलचा उपयोग आपला उद्योग आराखडा आणि त्या संबंधीत योजने साठी होते अश्याच उद्योगातील बिझिनेस मॉडेलने तुम्ही तुमचा उद्योग नियोजित करू शकता आणि उद्योगातील चुका टाळू शकता.
डॉ. शिवांगी झरकर
Born 2 Biz
Comments
Post a Comment