उद्योगाची नव – शक्ती
“उद्योगाला लावा नवरात्रीचे
तोरण...
त्यासाथी नव-शक्तीला जागृत करुन आजच उचला लक्ष्यसिध्दीचे धोरण...”
ऊर्जा हे प्रत्येक गोष्टीच्या सजीवतेचे प्रमुख लक्षण आहे आणि ही असीम ऊर्जा निर्माण होते, शक्तिच्या विविध स्वरुपाने ... आताच नवरात्री संपली ... आणि सर्वांनी ह्या शक्तीच्या स्वरूपाचे मनापासून स्मरण केले असणारच ... ह्याच मिळालेल्या नवशक्तीला ... नवयुक्तीत रुपांतरीत करून आपण कसे उद्योगात यश मिळवू शकतो ह्याचा अभ्यास आपण करणार आहोत...
आज आपण उद्योगातील विविध शक्ती स्वरूपांची संपूर्ण माहिती घेणार आहोत...
श्रुती (ज्ञान) : माता सरस्वतीचा ज्ञानाचा आशीर्वाद नेहमीच फलदायी ठरतो... कोणत्या उद्योगात त्या उद्योगाची कमीतकमी 25% माहिती तुम्हांला उद्योग सुरू करताना हवी. येणाऱ्या 1 वर्षात तुम्ही ह्या ज्ञानात 25% भर पाडायला हवी तरच तुम्ही उद्योगात पुढे टिकू शकतात... येणाऱ्या 3 वर्षात पुढील 50% माहिती मिळवणे गरजेचे आहे. म्हणून तर बोलतात ना प्रत्येक उद्योगासाठी पहिले 1000 दिवस महत्वाचे आहेत.
रचना (कल्पना) : योजनेला वास्तवात रुपांतरीत करायचे असेल तर त्याला योग्य कल्पना देणे गरजेचे आहे. कल्पनेचे वास्तवीक स्वरुप नेहमी रचना असते आणि रचनेला ध्येय प्राप्त झाले तर त्यातून योजना बनते म्हणून जास्तीत जास्त कल्पनांना जागृत करा. दररोज आपल्याला कमीत कमी १०० कल्पना येतात त्यातील १० कल्पना तुमच्या रचना बनतात आणि त्यातील १ रचनेला तुम्ही तुमची योजना बनवतात.
प्राप्ती (स्त्रोत) : उद्योगासाठी सर्वात महत्वाचा स्त्रोत असतो. तुमच्या ओळखी... लोकांचा तुमच्यावर असलेला संपूर्ण विश्वास ... ह्यासाठी काही मूलभूत स्त्रोत असणे आवश्यक आहे. हे स्त्रोत तुमच्या उद्योगात सतत ऊर्जा देण्याचे काम करतात त्यामुळे उद्योग नेहमीच सशक्त राहतो. स्त्रोत हे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. काही स्त्रोत हे वस्तूमय असतील तर काही गुणांच्या ... माणसांच्या स्वरुपात असतील ... आपण आपल्या उद्योगाचा प्लान म्हणून आपले स्त्रोत सक्षम ठेवणे गरजेचे आहे.
मुद्रा (संपत्ती) : मी बहुतेक वेळा हे ऐकते की “ मला पैसा नको ” “मी पैश्यासाठी उद्योग करत नाही” असे बोलणारे नेहमीच देवी लक्ष्मीचा अनादर करतात. उद्योग आला की व्यवहार आला आणि व्यवहार आला की पैश्याची उलाढाल आली ... गुंतवणूक आली ... म्हणून शक्तींचे हे स्वरूप प्रमुख मानले जाते. त्यामुळे पैश्याचा आदर करा. उद्योग हा व्यवहाराचा पैसे कमवण्याचा मार्ग आहे ... त्याचा उद्देश हा संपत्ती कमवणे हा असलाच पाहिजे ... उद्योगात आपण समाजसेवा नाही करु शकत... लोकं बोलतात की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही ह्याचे कारण लक्ष्मी म्हणजे व्यवहार जो अतीशय पारदर्शक हवा आणि सरस्वती म्हणजे समाजकल्याण ज्यात देणे जास्त हवे घेण्यापेक्षा त्यामुळे उद्योगात तुम्हांला स्वार्थात परमार्थ करणे जमले पाहिजे जेणे करुन तुम्ही समतोल साधू शकाल.
मोहिनी (योजना) : प्रत्येकाला मोहिनी हा शब्द अतीशय रुचतो... उद्योगात ह्याचे फ़ार महत्व आहे. कारण जर उद्योग मोहक नसेल तर तुम्ही लोकांना मोहित करु शकत नाही ना कोणते प्रलोभन देऊ शकतात. लोकांना तुमच्या वस्तूंत किंवा सेवेत रस वाढवायचा असेल तर उद्योगात मोहीनी ह्या शक्तीला जागृत ठेवणे अत्यंत गरजेचे असते तरच तुम्हांला आणि तुमच्या उद्योगाला लोकं पसंद करतात. त्यासाठी ३६५ दिवसाच्या कमीत कमी ३०% तुमच्या उद्योगात, सेवेत, वस्तूंत विविध ओफ़र असणे आवश्यक आहे. तुमची जाहिरात्त, मार्केटिंग, प्रमोशन मोहक करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा उद्योग नेहमीच एवर ग्रीन राहतो.
कृती (क्रिया) : Action speaks More than words !.. ह्याच प्रमाणे प्रत्येक उद्योगासाठी फक्त ज्ञान असणे आवश्यक नसते तर त्या ज्ञानाला अनुभवात रुपांतरीत करणे आवश्यक असते. म्हणून कृती हा एक महत्वाचा शक्तीचा भाग आहे, जो ज्ञानाच्या स्थिरउर्जेला कृतीच्या गतीज उर्जेत रुपांतरीत करतो. जो पर्यंत आपण कृती करत नाही आपल्याला उद्योगात दिशा मिळत नाही. ९०% उद्योजक फ़क्त विचार करतात ध्येय साधतात... प्लानिंग करतात पण जेव्हा वेळ येते निर्णयाची किंबहुना पाऊल उचलायची तेव्हाच कच खातात आणि रिस्क घ्यायला घाबरतात व कृती करत नाहीत.
अनुश्री (अनुभव) : अनुभवासारखा मोठा गुरु कोणताच नाही. आज कोणत्याही गुरूला मान हा फक्त त्याच्या ज्ञानामुळे नाही, तर त्याला आलेल्या अनुभवामुळे मिळतो. तुम्हांला किती उद्योगातील माहीत आहे ह्या पेक्षा हे माहीत आहे ते योग्य रित्या कसे वापरता येईल, ह्या अभ्यास म्हणजे अनुभव... अनुभवासाठी वयाची मर्यादा नसते तर विविध गोष्टींचा योग्य आणि योग्य वेळी वापर हा असतो.
रक्षा (संरक्षण) : शक्तींचे हे स्वरूप तुम्हांला सर्व चुकीच्या गोष्टींपासून वाचवते जशी काली माता आपले रक्षण करते त्याच प्रमाणे आपण आपल्या उद्योगाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. कोणतीही घटना घडण्याचा अंदाज असणे आवश्यक आहे म्हणून संरक्षण महत्वाचे ठरते. संरक्षण म्हटले की ढाल आणि तलवार दोन्ही आली... ह्याचा अर्थ उद्योगात नेहमी ३ पर्यात हवे जे तुमचे प्लानिंग (योजना) हवे.
पहिला पर्याय – (मुख्य प्लानिंग) – जसे ठरवले आहे तसेच कृतीत आणायचे.
दुसरा पर्याय – (पर्यायी प्लानिंग) – जर पहिला प्लान फ़सला किंवा यशस्वी नाही झाला तर त्याला जोड म्हणून वेळेचे नुकसान नको म्हणून घेतली जाणारी स्पेप्स.
तिसरा पर्याय – ( बाहेर येण्याचे प्लानिंग) – जर पर्याय एक व दोन फ़सले आणि आता स्वत:ला वाचवायचे असेल तर योग्य प्रकारे नुकसान न होऊ देता घेतला जाणारा पर्याय ज्याला एक्झिट प्लान म्हणतात.
पर्याय पहिला हा मुख्य उद्योग असतो पण पर्याय दोन आणि तिन संरक्षक म्हणून माता काली सारखे आपले रक्षण करतात
९. प्रबोधिनी (उत्क्रांती) : उद्योगात वृध्दी हवी, तर त्याला योग्य असे संवर्धन आणि जोपासणी हवी. एखादा उद्योग वाढवायचा म्हटला तर सर्वात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे उत्क्रांतीचा !... कारण वाढ ही योग्य दिशेला निर्माण झाली की उत्क्रांती घडून येते. जर तुम्हांला तुमच्या उद्योगात प्रबोधन हवे तर उत्क्रांतीची ज्योत लावायला हवी. त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे मागचे पाऊल आणि पुढचे पाऊल ह्या मध्ये तुम्ही योग्य मोजणी करुन स्वत:चा वेग ठरवून घेऊ शकता. उत्क्रांती नेहमी नविन गोष्टींना, कल्पनांना आणि नविन ध्येयांना जन्म देते, ज्यामुळे तुम्ही उद्योग सृजनाचे कार्य करता.
१०. उद्यश्री (ध्येय) : उद्योगात जर लक्ष्य निश्चित नसेल, तर कधीच ध्येय गाठता येत नाही. उद्योगात लक्ष्यपूर्ती तेव्हाचं होते, जेव्हा तुमच्या ध्येयाला लक्ष्य प्राप्त होते. उद्यश्री शक्ती तुम्हांला तुमच्या उद्योगाचे लक्ष्य प्राप्त करुन देण्यासाठी उद्युक्त करते. उद्यश्री म्हणजे तुमच्या नव-शक्तीची ख-या अर्थाने विजयादशमी असते. जेव्हा उद्योगात तुमच्या नव-शक्ती एकत्र येतात तेव्हा ख-या अर्थांने उद्योगात दस-याचे तोरण लागले जाते.
उद्योगात नव-शक्तीचा लक्ष्य-सिध्दी सोहळा :
उद्योगात सरस्वती (ज्ञान), लक्ष्मी (संपत्ती) आणि काली (कृती व संरक्षण) ह्यांचा समभुज त्रिकोण आखून घ्या. ज्याच्यानुसार उद्योगाचा आराखडा बनून मिळेल.
उद्योगात आपले स्त्रोत जाणून घेऊन अनुभवावर पुढील योजना बनवून घ्या.
नेहमी संरक्षणाचा विचार ध्यानात ठेवून स्वत:चे पर्याय व पर्यायी रस्ते निर्माण करा. जेणे करुन नुकसान होणार आहे.
प्रबोधनाला प्रगतीवर रुपांतरीत करण्यासाठी उद्योगाला उद्देश प्राप्त करुन द्या.
ह्याच पध्दतीने तुम्ही ह्या नव-शक्तीला सपूंर्ण जागृत करुन स्वत:च्या उद्योगाला उर्जा प्राप्त करुन द्या. जेणे करुन उद्योग वेगाने वाढू शकेल.
“उद्योगाला यशासाठी लागते उर्जेची ज्योती....
त्यासाठी निर्माण करावी लागते स्वत:च्या नाविण्यपूर्ण ब्रांडची ख्याती...
उद्देशाला ध्येय धारण करायचे असेल तर निर्माण करावी लागेल योग्य अशी नाती...
जर आज कराल योग्य कल्पनेला हवी तशी रचना, तरचं पूर्ण होईल लक्ष्यपूर्ती...”
डॉ.शिवांगी झरकर
(बॉर्न २ बिझ – करिअर व बिझनेस ट्रेनर आणि कोच )
मो. नंबर – 8850373717

Comments
Post a Comment