Skip to main content

Posts

Showing posts from April, 2018

Franchise Module

Franchise:                     Franchise means development. If you would like to run your business with passive income sources that time, business should be expand in multiple ways. Business goes hand and hand with marketing and franchising. There are lots of businesses which can be growing with franchise model. Franchise is replica of main branch or company.   Franchise Structure: 1.     Franchisee:  A person, who will buy a franchise, is a franchisee. After franchising, Franchise buys the right to operate a business, while using the franchisor name and existing branding.   2.     Franchisor:  This pertains to the company that sells franchises to franchisees. Franchisors are primarily the parent company that has settled and established processes, products, and branding. The same is then passed on to franchisees in exchange...

Don't be just Company ..... Be Multinational company with International Brand.

Don't be just Company ..... Be Multinational company with International Brand. Streach your limit and Start own offices across globe. Now days its easier to start Business or do Joint venture in some inspiring countries. If you would like to be Multinational Company then you have to plan business with international market strategy. We are helping tou to guide about Some developed countries which are best for Business. 1. Denmark Not only is Denmark one of the world's most entrepreneurial countries, the government makes it easy to start up new businesses. 2. Hong Kong Not a separate country, but a territory of China, Hong Kong has a low tax burden on businesses with relatively low government red tape. 3. New Zealand Some 20 years of government investment has transformed New Zealand's economy into one that is nimble, free-market, industrialized--and globally competitive. 4. Ireland Ireland ranks at the top for personal freedom, and has a relatively low tax...

NLP Sales and Marketing

एन. एल. पी. - मार्केटिंग व सेल्स (NLP – Marketing & Sales) “मार्केटिंगला लागते सेल्सची जोड,  आणि उद्योग जगात उद्योगवृध्दीसाठी एन. एल. पी शिवाय दुस-या कश्याची नाही तोड... ”            उद्योग जर एक वाहन आहे तर उद्योग चालवण्यासाठी किंवा चालत ठेवण्यासाठी मार्केटिंग व सेल्स हे त्या वाहनात लागणारे इंधन आहे. माझ्या बऱ्याचश्या मित्र-मैत्रीणीना उद्योग हवा असतो वा सुरु करायचा असतो पण सर्वात मोठी गोष्ट आडवी येते ती म्हणजे मार्केटिंग व सेल्स. मार्केटिंग व सेल्स, हे दोन्ही नसेल, तर उद्योगाचे बारा वाजतात.           मोठ-मोठ्या कंपनी मध्ये मार्केटिंग व सेल्सचे नियोजन करण्यासाठी,तसेच उद्योगातील मार्केटिंग म्हणजेच विपणन वृद्धी साठी धोरणे आखली जातात. परंतु एका सामान्य उद्योजकाला हे मार्केटिंग व सेल्स चे काम तसेच त्या अनुषंगाने येणारी अव्हाहने आणि त्या बद्दलची आखणी व धोरणे स्वतःच करावी लागतात आणि प्रश्न सुद्धा स्वतःच  सोडवावे लागतात. आपल्याला उद्योग मार्केटिंगमध्ये येणारी आव्हाहने: १. आपल्या उद्योगाबद्दल तसेच आपल्या प्रोडक्त कि...

MBA In 3 Hours

एम बी ए. इन ३ आवर्स – on the Spot Management “ उद्योग वृध्दीला लागते मार्केटिंगचे वाहन... आणि निर्माण केलेल्या उद्योगविश्वाला टिकवण्यासाठी लागते एम.बी.एचे साधन...”      उद्योग क्षेत्रात उद्योजक बहुतांशी उद्योग आधी सुरु करतात आणि नंतर ह्या उद्योगाला एका साच्यात टाकण्याचा प्रयत्न करतात. ह्याच साच्याला मैनिजमेंट असे म्हणतात. उद्योग छोटा असो वा मोठा तो लयबध्द असणे आवश्यक आहे आणि ह्या उद्योगाला लय बध्द करण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट लागते अध्ययन , विकसन आणि एकसुत्रता. तुम्ही कितीही चांगले मार्केटिंग केले ... कितीही सेल्स केला आणि प्रोफ़िट कमवला तरीही ती गोष्ट अळवावरचे पाणी असते... कधीही वाळू प्रमाणे संपूर्ण उद्योग हातातून सटकून जातो आणि तुम्हांला समजत सुध्दा नाही.. आपण वर्तमानपत्रात बराचं वेळेला वाचतो की एखाद्या कंपनीला टाळू लागले...युनियन प्रोब्मेल... आर्थिक नुकसान... ह्यामुळे उद्योग डबघाईला आला. अश्याच विविध कारणांमुळे उद्योग बंद पडतो... खरे कारण एकचं “मैनिजमेंट” किंवा व्यवस्थापनेची कमतरता. मैनिजमेंट, उद्योग क्षेत्रात पाठीच्या कण्याचे काम करते. जर तुमचा औद्योगिक कणा सरळ आ...

Motivation.... key of Success

उद्योग प्रेरणा : व्यक्तीमत्वाची नविन ओळख “पेटून उठावे, उजळून जळावे, कधीतरी चमकण्यासाठी, सुर्यासारखे जळून बघावे”             उद्योगधंद्यात यश मिळवण्यासाठी आणि आपल्या प्रतिभेला उच्चांकावर पोहोचवण्यासाठी गरज असते प्रेरणेची म्हणजे just Fire up!... म्हणजे पेटून उठण्याची... जीवनात काहे तरी करावे... उद्योग सुरु करावा स्वत:चे Own boss व्हावे अश्या ब-याच कल्पना सर्वांच्या मनात येत असतात पण, ह्या कल्पनांना वास्तवात काहीच लोकं रुपांतरीत करु शकतात आणि ह्याच बदलाला महत्वाचे स्वरुप मिळते, तुमच्या मनाच्या तयारीने... आणि तुमच्यातील त्या प्रेरणेने... कल्पना, विचार किंवा मन ही गोष्ट, एका ३६०च्या स्पीडने पळणा-या भरधाव कार सारखी असते त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो ... पण ह्याला साथ लागते तुमच्या संयमरुपी ड्रायवरची म्हणजे तुमच्या सतत जीवंत असलेल्या प्रतिभेने उजळून निघालेल्या प्रेरणेची. उद्योगात प्रबल इच्छाशक्ती लागतेच, योग्य मार्गदर्शन सुध्दा हवेच किंवा संकटांला संधीत रुपांतरीत करण्याची तयारी लागते , अश्या प्रकारच्या उद्योगाला लागणा-या तांत्रिक बाबी आपल्याला वारंवार मासिक,...

उद्योग संस्कार... New Way of Business

उद्योग संस्कार : उद्योगाला एक नाविण्यपूर्ण आकार उद्योग संस्कार म्हणजे काय?        मुल जन्माला आल्यापासून, ज्या छोट्या छोट्या सवयी मधून त्याला जे जे शिकायला मिळते, त्यामुळे मुलाच्या जीवनाला व मनाला एक दिशा मिळते आणि त्यांची फ़लश्रुती म्हणून मिळते त्याला एक व्यक्तीमत्व. जे त्याला घडवते, बनवते आणि पुढे नेते. त्याच्या बळावर ते मुल मोठे होऊन प्रगती करते, परंतु कितीही बदल आपल्या जीवनात आपण केले, तरीही बालपणीच्या त्या सवयी कधीही कोणीच मिटवू शकत नाही ना पुसले जाते. असेच काहीस नाते असते उद्योगाचे , आपले आणि उद्योग संस्काराचे..... आपल्याला जे जे अनुभव उद्योग क्षेत्रात येतात... जे आपण प्रत्येक क्षणात शिकतो... त्याच्याने आपले व्यावसायिक, सामाजिक आणि आर्थिक चित्र सुस्पष्ट होते, त्यांना उराशी बाळगत निर्माण होते, एक उद्योग प्रतिबिंब. हे प्रतिबिंब जर तुम्हांला स्वच्छ , निर्मळ आणि तेजस्वी ठेवायचे असेल , तर दररोज द्यावे लागतात. “ उद्योग संस्कार ”         मित्रांनो , उद्योगाला धंदा आणि व्यवसाय असेही म्हणतात. परंतु धंदा आणि व्यवसाय ह्या दोन्ही गोष्टी थोड्याफ़ार प...

Business Module Making....

  उद्योगाचे बिझिनेस मॉडेल  I. उद्योगाचे नियोजन पूर्वतयारी - उद्योग संस्कार झाले की वेळ येते उद्योग साक्षरतेची म्हणजे उद्योग शिकण्याची... उद्योग हा कृतीमधून शिकण्याचा विषय आहे, ज्यात प्रत्येक विषय वेगळा आणि त्याची तयारी, नियोजन, योजना, नफा-तोटा, ध्येय आणि त्याची धारणा संपूर्ण वेगळी असते. त्यामुळे उद्योग नियोजनापूर्वी तयारी करणे आवश्यक आहे. उद्योगाची पूर्वतयारी, तुमचे उद्योग बिझिनेस मॉडेल बनवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागजपत्रांच्या कामी येते त्यामुळे जर तुम्हांला उद्योग बिझिनेसचा मॉडेल किंबहुना आराखडा काढण्याचा वर्गपाठ पक्का करायचा असेल तर हा पूर्वतयारीचा गृहपाठ पक्का करणे आवश्यक आहे.   त्यासाठी खालील गोष्टींची वास्तव माहिती असणे आवश्यक आहे. 1. सुरू करणारा किंवा केलेला उद्योग हा निव्वळ हौस आहे की त्यात तुमचे काही ध्येय आणि लक्ष्य निश्चित केले आहे? 2. तुमची मालमत्ता आणि जवाबदाऱ्या किती आहेत? 3. तुम्हांला स्वतःचे प्रतीदिन किती उत्पन्न हवे आहे? 4. तुम्हांला त्या उद्योगाची तांत्रिक, औद्योगिक, सामाजिक,  व्यवस्थापनाची किती माहिती आहे? 5. तुम्ही निवडलेला...

What's Up to What's App...

वाट्स अप बोलण्यापासून.... वाट्स अप वायरल मार्केटिंगपर्यंत... “ बोलण्यासाठी शब्द लागतात... संभाषणासाठी भावनात्मक मने... सेल्ससाठी भावना निर्माण करण्यासाठी, वाट्स अप मार्केटिंग घेऊन येते लाखो नवीन साधने...” वायरल मार्केटिंग म्हणजे काय ? उद्योगाचे मुख्य अंग म्हणजे मार्केटिंग. आणि ९९% लोक मार्केटिंग मध्येच अयशस्वी होतात म्हणून ते सेल्स करु शकत नाहीत. मार्केटिंगला आमच्या एम.बी.ए. च्या भाषेत स्वीट पोईझन म्हणजे गोड विष म्हणतात. कारण कधी कधी समोरची व्यक्ती जाणून बुजून स्वत:चे प्रोडक्ट किंवा सर्विस गळ्यात टाकू इच्छिते आणि आपण सर्व माहिती असूनही हे विष पोटात ढकलतो पण एक एक सुध्दा शब्द काढला जात नाही. अश्याच ५२ मार्केटिंग प्रकारातमध्ये अजून एक आधुनिक मार्केटिंग मिसळला गेला... ज्याचा स्पीड फ़ार जास्त आहे. त्याचे नाव आहे “वायरल मार्केटिंग”... वायरल मार्केटिंग म्हणजे ज्या मध्ये सर्व डिझिटल साधने वापरली जातात. जसे सोशल मेडिआ, डिझिटल मार्केटिंग आणि टि.व्ही. मेडिआ. वायरल मार्केटिंग मधील मुख्य प्रकार कोणते? वायरल मार्केटिंग म्हणजे एखादी गोष्ट प्रकाश झोतासारखी एका बुलेट ट्रेनसारखी फ़ास्ट जाते. आण...

ऊर्जा..... Energy for Business

उद्योगाची  नव – शक्ती “उद्योगाला लावा नवरात्रीचे तोरण... त्यासाथी नव-शक्तीला जागृत करुन आजच उचला लक्ष्यसिध्दीचे धोरण...”         ऊर्जा हे प्रत्येक गोष्टीच्या सजीवतेचे प्रमुख लक्षण आहे आणि ही असीम ऊर्जा निर्माण होते, शक्तिच्या विविध स्वरुपाने ... आताच नवरात्री संपली ... आणि सर्वांनी ह्या शक्तीच्या स्वरूपाचे मनापासून स्मरण केले असणारच ... ह्याच मिळालेल्या नवशक्तीला ... नवयुक्तीत रुपांतरीत करून आपण कसे उद्योगात यश मिळवू शकतो ह्याचा अभ्यास आपण करणार आहोत... आज आपण उद्योगातील विविध शक्ती स्वरूपांची संपूर्ण माहिती घेणार आहोत... श्रुती (ज्ञान) : माता सरस्वतीचा ज्ञानाचा आशीर्वाद नेहमीच फलदायी ठरतो... कोणत्या उद्योगात त्या उद्योगाची कमीतकमी 25% माहिती तुम्हांला  उद्योग सुरू करताना हवी. येणाऱ्या 1 वर्षात तुम्ही ह्या ज्ञानात 25% भर पाडायला हवी तरच तुम्ही उद्योगात पुढे टिकू शकतात... येणाऱ्या 3 वर्षात पुढील 50% माहिती मिळवणे गरजेचे आहे. म्हणून तर बोलतात ना प्रत्येक उद्योगासाठी पहिले 1000 दिवस महत्वाचे आहेत. रचना (कल्पना) : योजनेला वास्तवात रुपांतरीत कराय...

Kaizen Management

कायझेन व्यवस्थापन - व्यवसायाची नवी स्थापना “व्यवस्थापनेला गरज योग्य अश्या पध्दतीची, तेव्हाच होईल विकास जेव्हा क्रमवारे चालत येईल आराखडा आणि घडेल किमया कायझेनची...”                  कायझेन व्यवसायात व्यवस्थापनासाठी निर्माण झालेली नवीन गरज आणि ओळख.. जपान हा व्यवस्थापनासाठी सर्वात अग्रेसर देश मानला जातो आणि त्यात सुरुवात झाली एका आगळ्या वेगळ्या व्यवस्थापनाची... कायझेन व्यवस्थापनाची... आज पर्यंत प्रत्येक उद्योगावर कोणत्या नी कोणत्या व्यवस्थापनेचा पगडा किंवा प्रभाव हा नेहमीच प्रभावशाली असतो ; जपान आणि जापनिस व्यक्ती उद्योग, वेळेचे नियोजन, माईंड सेट, दूरदृष्टी, व्यवस्थापन, निर्मोती ह्या गोष्टींसाठी नेहमीच जगाहून पुढे राहिले आहेत. आज आपण जपान मधील नामांकित व्यवस्थापनेची अगदी सोप्या पध्दतीने माहिती घेणार आहोत. कायझेन- नवीन बदल... बदलण्यासाठी... कायझेन म्हणजे काय? कायझेन म्हणजे चांगल्यासाठी केले गेलेले बदल.पण उद्योगाच्या भाषेत बोलायचे तर ह्याचा अर्थ होतो सातत्य आणि सतत सुधारणा. कायझेन म्हणजे आपला माईंड सेट जो उद्योगाप्रमाणे सतत बदलावा लागतो आ...

प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करावा ????

बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा... “ उद्योगाचे स्वप्न नुसते उराशी नका बाळगू .... आता त्याला बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट मध्ये रुपांतरीत करुन वास्तवात घडवू...” I.बिझिनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय? आपल्या मनात जेव्हा उद्योग करण्याची कल्पना येते... तेव्हा तेव्हा आपण त्या कल्पनेला वास्तवाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असतो... ह्याच वास्तवीक स्वरुपाला घडवण्याच्या मार्गात पहिले पाऊल म्हणजे आपल्या उद्योगाचा बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट. बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपल्या भावी उद्योगाचा, त्याच्या पद्धतीचा, संभाव्या नफ्याचा आणि येणाऱ्या 5 वर्षातील उत्पन्नाचा रीतसर आढावा असतो. ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कल्पनेला वास्तवात उतरवण्यात मदत करू शकता. II. बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्टचे फायदे:- 1. बिझिनेस मॉडेल डिझाईन करण्यात फायदा होतो. 2. उद्योगाचे नियोजन करण्यास मदत मिळते. 3. बँकेतर्फे कर्ज मिळवण्यास मदत मिळते. 4. बिझिनेस स्टार्ट-अपसाठी प्रार्थमिक गुंतवणूकदार मिळवण्यास मदत होते. 5. प्रत्येक पाऊल तोलून मापून घेण्यास मदत होते. III. बिझिनेस प्रॉजेक्टचा आराखडा :- 1. आपल्या कंपनीच...

Ratan Tata .... True Entrepreneur

7 Top most Qualities of Ratan Tata....  Today 28/12/2017 is his birthday so on his birthday I am sharing you his all top qualities... now this new year will be rocked with New direction... 1) Have a vision:- Mr. Ratan Tata always had a vision for his organization and himself. He knew where he is right know and where he wants his organization to be down the line. His ambitious vision of creating a car for the common man which costs only 1 lakh “Nano” has been a success and this shows his ability to visualize the needs and demand for the future. 2) Use creative tendencies than reactive tendencies to get results:-  Be creative rather than being reactive. Being proactive and solving problems even before they come is one of the most important qualities of an entrepreneur. A person should not have a tendency to react only when the situation demands but the person should be able to be anticipate what will happen in future and be able to adjust himself to it in present. An ...

Spirituality in Your Business

Spirituality In Your Business.... Spirituality म्हणजे अध्यात्म ... बहुदा लोक अध्यात्माला चुकीच्या अर्थी घेऊन त्याला धार्मिक करतात... अध्यात्म म्हणजे धार्मिक गोष्टी किंवा एखादी रितीभाती नव्हे... अध्यात्म म्हणजे स्वतःला.... स्वतःच्या नैसर्गिक शक्तींना ह्या निर्सगाशी जोडणे... विलीन करणे... ह्या निसर्गाचे काही नियम आहेत आणि ते जर तुम्ही खऱ्या मनाने स्वीकारून फॉलो केलेत तर तुम्ही निसर्गाच्या सर्व शक्तींचा लाभ घेऊ शकता... जे खूप सोपे आहे पण रस्ता कठिण... ह्याच गोष्टी जर सकारात्मकतेने घेतल्या तर तुम्ही कोणत्याही व्यवसायात यश मिळवू शकता... तुमच्या उद्योगात आणि यशाच्या मध्ये मोलाचे काम करते अध्यात्म...आज वर जे जे बिझिनेस मन मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले किंवा शून्यात विश्व निर्माण केले ते सर्व अध्यात्माच्या आणि नेचर लॉशी खूप निगडीत होते किंवा आहेत.... आणि आजही ते ह्या गोष्टी मनापासून फॉलो करतात... आज त्यातील काही गोष्टी किंवा कोणते बदल अपेक्षित आहे उद्योगात अध्यात्माची जोड़ घेऊन ते आज आपण बघूया... 1. सकारात्मक दृष्टिकोन - परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपला दृष्टिकोण आपण बदलू नये.. प्रत्...